Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग; 2 जण रुग्णालयात दाखल

शनिवारी दुपारी 12.49 वाजता, गोरेगाव पश्चिमेतील निवासी उच्चभ्रू असलेल्या कल्पतरू रेडियन्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon (फोटो सौजन्य - ट्विटर)

Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगाव येथील एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी दुपारी 12.49 वाजता, गोरेगाव पश्चिमेतील निवासी उच्चभ्रू असलेल्या कल्पतरू रेडियन्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुपारी 2.18 च्या सुमारास आग विझवण्यात आली. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मनोज चौहान (वय 30 ते 35 वर्षे) आणि शहाबुद्दीन (50) अशी आगीमुळे गुदमरलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) निवेदनात म्हटले आहे. ही आग 2 बेसमेंट + 3 पोडियम + निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, घरगुती वस्तू आणि इतरांपर्यंत मर्यादित होती, असंही बीएमसीच्या निवेदनात नमूद केलं आहे. कल्पतरू रेडियन्स ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक भव्य निवासी इमारत आहे.

गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग - 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement