Ranjit Singh Disale यांना मिळाली Teacher Prize Traphy; फोटो शेअर करत म्हणाले, अखेर ती माझ्या जीवनात आलीचं
गेल्या काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी यांना ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार जाहीर झाला होता.
रणजित सिंह डिसले यांनी आपल्या ट्विट अकाऊटवरून अत्यंत आनंदाची बातमी शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी यांना ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार जाहीर झाला होता. आता त्यांना या पुरस्काराची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीचा फोटो शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटीझन्सकडून त्यांच्यांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. गुरुजींनी पहिल्या ट्विटमध्ये 'अखेर ती माझ्या जीवनात, माझ्या घरी आलीच,' ओळखा पाहू?? असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी 'हीच ती' असं म्हणत ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)