Woman Delivered in Railway: नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती; महिला डॉक्टर व महिला प्रवाशांच्या मदतीने करण्यात आली डिलीव्हरी

नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाली. महिला डॉक्टर व महिला प्रवाशांच्या मदतीने ही डिलीव्हरी करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप आहेत.

Woman Delivered in Railway (PC - Twitter/@lokmat)

Woman Delivered in Railway: रविवारी नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाली. महिला डॉक्टर व महिला प्रवाशांच्या मदतीने ही डिलीव्हरी करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप आहेत. प्राप्त माहितीनुसार, जालना रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यानंतर रेल्वेत कोणी डॉक्टर आहे का? याची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर योगायोगाने नांदेड येथील डॉ. अश्विनी इंगळे यांनी आपण डॉक्टर असल्याचं सांगितलं आणि त्यांनी महिला रेल्वे प्रवाशांच्या मदतीने गरोदर महिलेची प्रसूती केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement