Farmers Protest in Mantralaya: मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलक संरक्षक जाळ्यांवर उड्या मारत आक्रमक झाल्याने उडाला गोंधळ; मंत्री दादा भुसेंशी चर्चा सुरू (Watch Video)

सध्या पोलिसांनी काही आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये नेले आहे तर काही जणांसोबत मंत्रालयात उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेत आहेत.

Mantralaya | Twitter

मंत्रालयामध्ये आज अप्पर वर्धा भागातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आक्रमक होत आंदोलन केले आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये काही जणांनी संरक्षक जाळ्यांमध्ये उड्या मारल्या आहेत. ही जाळी पहिल्या मजल्यावर बसवण्यात आहे. यामुळे अशा अंदोलनकर्त्यांसोबत अनर्थ घडणं टाळण्यास मदत होते. दरम्यान जमिनींना योग्य भाव आणि अन्य मागण्यांसाठी ते आक्रमक झाले आहेत. सध्या पोलिसांनी काही आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये नेले आहे तर काही जणांसोबत मंत्रालयात उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेत आहेत.

पहा मंत्रालयातील आंदोलन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now