Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video)

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर येथे झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे. कारखान्याचे छत पडले असून ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहे.

Explosion In Bhandara's Ordinance Factory:

महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत शुक्रवारी सकाळी स्फोट झाला. या अपघातात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, इतर अनेक कर्मचारी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर येथे झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे. कारखान्याचे छत पडले असून ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहे. तेथे एकूण 12 लोक उपस्थित होते, त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटाची छायाचित्रेही समोर येत असून, त्यात शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्याचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहेत. हा स्फोट भीषण होता. स्फोटाचा आवाज 5 ते 7 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून स्फोटाच्या गांभीर्याचा अंदाज येऊ शकतो. सी विभागातील 23 क्रमांकाच्या इमारतीत हा स्फोट झाला. (हेही वाचा: Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं)

Explosion In Bhandara's Ordinance Factory:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now