Seva Vikas Coop. Bank Fraud Case: सेवा विकास बँकेच्या गैरव्यवहारा प्रकरणी पुण्यात ईडीची छापेमार, 122 कोटी जप्त
सेवा विकास कॉपरेशन बँकेच्या 429 कोटीच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुण्यातील 47 स्थावर मालमत्ता आणि अमर मुलचंदानी, विवेक अरन्हा, सागर सुर्यवंशी आणि इतर आणि त्यांचे कुटुंबीय/संस्थेशी संबधीत 122.35 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.सेवा विकास कॉपरेशन बँकेच्या 429 कोटीच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. पिंपरी मधील मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)