Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed: अंबरनाथमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत

रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे.

Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed (PC - Twitter)

Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed: अंबरनाथ साइडिंगमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला. यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे. याशिवाय डीएन अंबरनाथ लोकल- उल्हासनगर स्टेशनच्या होम सिग्नलवर रोखण्यात आली आहे. या तीन गाड्यांमधील प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे विभागाने खेद व्यक्त केला आहे. (वाचा - Mumbai Trident Building Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now