Eid Mubarak: अभिनेता शाहरुख खान मुलगा अबरामसोबत मन्नत बाहेर, चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!
शाहरुख खान नेहमी ईदच्या निमित्ताने त्याच्या मुंबईतील घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे शाहरुखने यंदाही आपल्या चाहत्यांना मन्नतबाहेर येत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्याच्या सोबत त्याचा मुलगा अबरामदेखील पाहायला मिळाला.
शाहरुख खान नेहमी ईदच्या निमित्ताने त्याच्या मुंबईतील घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे शाहरुखने यंदाही आपल्या चाहत्यांना मन्नतबाहेर येत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्याच्या सोबत त्याचा मुलगा अबरामदेखील पाहायला मिळाला. त्यामुळे खान पितापुत्रांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पांढऱ्या रंगाचा पोशाख घातलेला शाहरुख खान मन्नतच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे हात हालवत त्यांना शुभेच्छा देताना आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसत होता. अभिनेत्याने हसून कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. या वेळी जनसमुदयाला अभिवादन करताना सुपरस्टारसोबत त्याचा मुलगा अबराम, 9 देखील उपस्थित होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)