Hasan Mushrif ED Raids: साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले

ईडीने दोन महिन्यात तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीने समन्स (ED summons) बजावले आहे. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी (sugar mill corruption case) मुश्रीफ यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावले आहे. ईडीने दोन महिन्यात तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी केली गेली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून साडे चार वाजता बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)