Badlapur News: बदलापूरात जाणवले भूकंपाचे धक्के? नागरिकात भीतीचे वातावरण, पाहा नेमकं काय घडले
या धक्क्यानंतर काही नागरिकांच्या घरातील सामानाचीही पडझड झाली. तेव्हा नागरिकांनी घाबरुन इमारतीखाली धाव घेतली. मात्र अद्यापही या धक्क्यांचे कारण समजू शकलेले नाही.
बदलापूर (Badlapur) शहरातील काही भागात आज दुपारी 2 च्या सुमारास सौम्य प्रमाणात हादरे जाणवले. हे हादरे भूकंपाच्या धक्क्यामुळे आल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. हादरे बसण्यामागे मायनिंग ब्लास्ट असल्याचे देखील काहींनी म्हटले आहे. दरम्यान या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पहायला मिळाले. बदलापूर पुर्वेकडे असलेल्या शिरगाव परिसरातील यादव नगर, मोहन पाम आणि आपटेवाडी या परिसरात हे सौम्य धक्के जाणवले गेले. या धक्क्यानंतर काही नागरिकांच्या घरातील सामानाचीही पडझड झाली. तेव्हा नागरिकांनी घाबरुन इमारतीखाली धाव घेतली. मात्र अद्यापही या धक्क्यांचे कारण समजू शकलेले नाही.
Felt small earthquake like vibration in BADLAPUR, Thane at 14:05 pm
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)