E-Panchnama in Maharashtra: ई-पंचनामे ते शेतकर्यांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ; विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय
गारपीट, अवकाळी पावसासारख्या संकंटांनी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची मदतीची मर्यादा २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर पर्यंत वाढवली आहे.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक दिवसीय परिषद आज मुंबई मध्ये पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीमध्ये राज्यातील सध्याची तीव्र उष्णता, पाणी, अवकाळी पाऊस, पावसाचा अंदाज, जलयुक्त शिवार अभियान यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार असून पंचनाम्याच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गारपीट, अवकाळी पावसासारख्या संकंटांनी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची मदतीची मर्यादा २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर पर्यंत वाढवली आहे.
पहा ट्वीट