Dugarwadi Waterfall (Nashik) News: जरा जपून! दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून, त्र्यंबक येथील घटना

एक 17 वर्षाचा पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित शर्मा असे या पर्यटकाचे नाव आहे. दुपारी चार वाजणेच्या सुमारास तो त्र्यंबकेश्वर जवळील काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलाहोता. मुळचा नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरातील असलेला हा तरुण पाण्यात वाहून गेला. सायंकाळी 7.30 पर्यंत त्याचा शोध घेतला गेला परंतू कोणताही थांगपत्ता लागला नाही.

Waterfall | Representational image (Photo Credits: pxhere)

Tourist Gets Swept in Dugarwadi Waterfall: साप्ताहिक सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी नाशिक (Nashik Rains) येथील दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfall) परिसरात गेलेला एक पर्यक वाहून गेला आहे. काल (16 जुलै) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या पर्यटकाचा शोध रात्री उशीरपर्यंत आणि आज (17 जुलै) आज सकाळीही सुरु होता. हा पर्यटक धबधबा पाहण्यासाठी पोहोचला होता. त्यामुळे नागरिकरांनी पर्यटनास जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी. पाण्याचा अंदाज नसेल तर उगाच नको तिथे शहानपणा करु नये, असे अवाहन नागरिक आणि प्रशासनही करत आहे.

यंदा पावसाने ओढ दिली आहे. उशीरा सुरु झालेल्या पावसातही फारसा जोर नाही. नाशिक जिल्हा आणि त्र्यंबकेश्वर परिसरातही दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले वाहू लागले आहगेत. त्यामुळे धबधब्यांनाही पाणी आहे. अशा वेळी त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाटी पोलीस आणि स्थानिक प्रशासानाकडून पर्यटकांना आगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची पुनरावृत्तीही केली जाते. मात्र, काही पर्यटक कारणाशिवाय धाडस करतात. ज्यामुळे अप्रिय घटना घडतात. (हेही वाचा, Himachal Pradesh Floods: पूराच्या पाण्यातून लहान मुलाची सुखरुप सुटका, पाहा व्हिडिओ)

सदर घटनेतही रविवारी दुपारी चारच्या सुमारास नदीचे पाणी वाढू लागले होते. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यापासून सुरक्षीत अंतरावर राहावे, असे अवाहन केले जात होते. काही पर्यटकांनी हे अवाहन झुगारले आणि ते अधिक जवळ गेले. परिणामी एक 17 वर्षाचा पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित शर्मा असे या पर्यटकाचे नाव आहे. दुपारी चार वाजणेच्या सुमारास तो त्र्यंबकेश्वर जवळील काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलाहोता. मुळचा नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरातील असलेला हा तरुण पाण्यात वाहून गेला. सायंकाळी 7.30 पर्यंत त्याचा शोध घेतला गेला परंतू कोणताही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आज सकाळीही या पर्यटकाचा यंत्रणांकडून शोध सुरु होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now