Mumbai Water Cut: वांद्रे पश्चिम येथील वॉटरफिल्ड रोड येथील जलवाहिनी फुटल्याने शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत होणार पाणीपुरवठा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यालगतच्या भागात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेदरम्यान पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. जलवाहिनीचे निर्जलीकरण, दुरुस्ती आणि चार्जिंगसह दुरुस्तीसाठी सुमारे 8 ते 10 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Water Cut: वांद्रे (पश्चिम) येथील वॉटरफिल्ड रोड येथे पर्जन्य जलवाहिनी कामादरम्यान पालीहिल जलाशय येथील 600 मिलीमीटर व्यासाचे इनलेट आज नादुरुस्त झाले. त्यामुळे 'एच' पश्चिम विभागामधील शेर्ली राजन रोड, चिंबई गाव, वरोडा रोड, मॅन्युएल गोन्झाल्व्हिस रस्त्यालगतचा परिसर, पेरी रोड, नवीन कांतवाडी परिसरातील पाणीपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान प्रभावित झाला. खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा आणि खारमधील 16 ते 21 क्रमांकाच्या रस्त्यावर 5.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. काही काळासाठी पाण्याचा दाब आणि पुरवठ्याचा कालावधीही कमी राहील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यालगतच्या भागात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेदरम्यान पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. जलवाहिनीचे निर्जलीकरण, दुरुस्ती आणि चार्जिंगसह दुरुस्तीसाठी सुमारे 8 ते 10 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे. (हेही वाचा - Mumbai: पाइपलाइन फुटल्याने वांद्रे, खार, सांताक्रूझमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now