Dog Attack Shocking Video: पालघरमध्ये वाढली कुत्र्यांची दहशत; डहाणू येथे सोसायटीत मोकाट कुत्र्याचा दोन महिलांवर जीवघेणा हल्ला (Watch)

माहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो.

Dog Attack Shocking Video

हल्ली अगदी दररोज कुत्र्याने किंवा कुत्र्यांच्या गटाने लोकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता पालघरमध्ये अशा कुत्र्यांची दहशत वाढल्याचे दिसत आहे. डहाणू येथे एका सोसायटीत मोकाट कुत्र्याने वृद्ध महिलेसह अन्य एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. याबाबतचा एका धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. माहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो. यावेळी ती महिला जमिनीवर खाली पडते. यामध्ये वंदना लोहार नावाची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. यानंतर आता डहाणू नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. (हेही वाचा: World's Most Expensive Dog 'WolfDog': बेंगळुरू येथील व्यक्तीने खरेदी केला लांडगा आणि कुत्र्याचे मिश्रण असलेला 'वुल्फडॉग' प्राणी; किंमत 50 कोटी)

Dog Attack Shocking Video: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement