Doctors Threaten Strike: मागण्या पूर्ण न झाल्यास 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा डॉक्टरांचा इशारा

MARDचे अध्यक्ष डॉ अविनाश दहिफळे यांनी ज्येष्ठ निवासी डॉक्टरांची 1,432 पदे निर्माण करण्याची आणि 16 ऑक्टोबर 2018 पासून प्रलंबित महागाई भत्त्याची देयके देण्याची मागणी केली आहे.

Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणे, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे निर्माण करणे, थकबाकी भरणे अशा काही मागण्या पूर्ण न झाल्यास 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. MARDचे अध्यक्ष डॉ अविनाश दहिफळे यांनी ज्येष्ठ निवासी डॉक्टरांची 1,432 पदे निर्माण करण्याची आणि 16 ऑक्टोबर 2018 पासून प्रलंबित महागाई भत्त्याची देयके देण्याची मागणी केली.

डॉक्टरांच्या मागण्या-

वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी 1,432 पदांची निर्मिती

सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरणे.

महागाई भत्त्याची थकबाकी देणे.

सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे.

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील असमानता दूर करणे.