OBC Reservation: राज्यातील भाजप नेत्यांचा केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणांना समर्थन आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

दिखावा करण्यासाठी आंदोलन करून आदळआपट करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांचा केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणांना समर्थन आहे का ? असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

Vijay Wadettiwar | (Photo Credits: Facebook)

दिखावा करण्यासाठी आंदोलन करून आदळआपट करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांचा केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणांना समर्थन आहे का ? असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. वडेट्टीवार यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार नाही. राज्यांना आवश्यक ओबीसींचा डाटा सुद्धा केंद्रातील भाजप सरकार उपलब्ध करून देणार नाही. हे केंद्र सरकारने काल संसदेत स्पष्ट केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा ओबीसी आरक्षणाला असलेला विरोध आता ओबीसी समाजाला स्पष्टपणे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement