Pune: बायकोला त्रासलेल्या नवऱ्याचा पोलिसांना फोन, पुणे शहरात बॉम्बस्फोटाची धमकी

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला लोकसभा निवडणुकीदरम्यान संभाव्य बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन कॉल आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. आलेल्या कॉलबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई न दाखवता पोलिसांनी सखोल तपास केला. पोलिसांना तपासाअंती लक्षात आले की, पत्नीला वैतागलेल्या एका पतीने त्रस्त होऊन हा कारनामा केला आहे.

Hoax Call (PC - Twitter/@ians_india)

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला लोकसभा निवडणुकीदरम्यान संभाव्य बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन कॉल आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. आलेल्या कॉलबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई न दाखवता पोलिसांनी सखोल तपास केला. पोलिसांना तपासाअंती लक्षात आले की, पत्नीला वैतागलेल्या एका पतीने त्रस्त होऊन हा कारनामा केला आहे. परिस्थितीने वैतागलेल्या पतीने पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करून खोटा दावा केला. ज्यामुळे अवघे पोलीस दल कामाला लागले.

पोलिसांनी सांगितले की, घटना पती-पत्नीमधील घरगुती वादापासून सुरु झाली. घरगुती वादातून पत्नी माहेरी निघून गेली. त्या संतापाच्या भरात पतीने चक्क पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन केला आणि शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट होण्याचा इशारा दिला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. कणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून तपास केला असता त्रस्त पतीचा कारनामा उघडकीस आला. (हेही वाचा, Delhi Crime: दिल्लीत चोरांनी भिंतीला भोक पाडून टाकला ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा )

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement