महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी दीनानाथ सिंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंग यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची ताकद किंचीत वाढल्याचे बोलले जात आहे.

Dinanath Singh | (Photo Credit- X)

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जाहीर पक्षप्रवेश, शह काटशह, तिकीटवाट. त्यावरुन रंगणारे मानापमान नाट्य यांसारख्या गोष्टी वेगाने घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंग यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची ताकद किंचीत वाढल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षास नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे. संदीप नाईक यांनी भाजपतील सर्व पदांचा राजीनामा देऊन ते आता शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement