Dhirubhai Ambani School Receives Bomb Threat Call: बीकेसी मधील धीरूभाई अंबानी स्कूल बॉम्बने उडवून देण्याचा कॉल; आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात
या शाळेच्या चेअरपर्सन नीता अंबानी आहेत.
मुंबई मध्ये बीकेसी स्थित धीरूभाई अंबानी स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल काल आला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास लॅन्डलाईन वर कॉल आल्यानंतर शाळेकडून पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शाळेच्या तक्रारी वरून कलम 505 (1)(B) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ट्रेस केल असून लवकरच अटक देखील करण्यात येईल असं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)