Mumbai Masjid Controversy: 'मशीदीची तोडफोड, हा आमच्या भावनांशी होणारा खेळ,' धारावीत मुस्लिम समुदायाच्या संतप्त भावना (Watch Videos)
धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरला. जोरदार घोषणाबाजी झाली.
Mumbai Masjid Controversy: धारावी येथील मशिदीचे अनधिकृत बांधकाम (Masjid Controversy)तोडण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या गाडीवर मुस्लिम समुदायाकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यामुळे दिवसभर तेथे तणावाची (Dharavi Violence)परिस्थीती पहायला मिळाली. धारावीतील नागरिकांनी पालिकेच्या वाहनाची तोडफोड केली. महानगरपालिकेच्या गाडी दाखल होताच नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात पुरूषांसह महिला आणि तरूणांचाही मोठा सहभाग पहायला मिळाला. नागरिकांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त करत, 'मशीदीची होणारी तोडफोड आमच्या भावनांशी होणारा खेळ आहे,' असे म्हटले आहे. (हेही वाचा: BMC Action Against Illegal Structure Of Masjid: धारावीतील बेकायदेशीर मशिदीवरून गोंधळ; कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड)
मशीदीची तोडफोड, हा आमच्या भावनांशी होणारा खेळ