Dhananjay Munde Health Update: धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर; एनसीपी नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली हॉस्पिटल मध्ये भेट

नंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे.कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील. असे राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

Health Minister Rajesh Tope | Photoo Credits: Facebook

महाविकास आघाडी सरकार मधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना काल रात्री हृद्यविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडे  यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एनसीपी नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे रात्री हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे.कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते.  काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील.  असे म्हटलं आहे.

राजेश टोपे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement