संकटात असणार्या शेतकरीच्या मागे उभं राहत कृषमंत्री Dhananjay Munde यांचा आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
काल मंत्रिपदाची जबाबादारी म्हणून कृषिमंत्रीपदाची घोषणा आणि आज वाढदिवस असा डबल सेलिब्रेशनचा मोका असतानाही धनंजय मुंडे यांनी बर्थ डे सेलिब्रेशन टाळलं आहे.
निम्मा जुलै महिना सरला तरीही महाराष्ट्राच्या अनेक भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी चिंतेमध्ये असताना वाढदिवस साजरा करणं उचित नसल्याचं सांगत नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सेलिब्रेशन टाळण्याचं आवाहन केले आहे. कालचा जाहीर झालेल्या खातेवाटपामध्ये अब्दुल सत्तारांकडून कृषि विभागाचा कारभार धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांचं स्वागत करताना कार्यकर्त्यांनी जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली होती.
पहा धनंजय मुंडे यांचं ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)