सातवा वेतन आयोग लागू करण्याचे राहून गेलेल्या 1410 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेतला आहे. राज्यातील विविध विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होता. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दोन फेब्रुवारीपासून कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर त्यांनी 16 फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्याचे राहून गेलेल्या एक हजार ४१० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेतला आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)