Sameer Wankhede : समीर वानखेडेंकडून राखी सावंत आणि तिच्या वकिलांविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण ?

नार्कोटिक्स ब्यूरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिचे वकील काशिफ खान विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Photo Credit - Facebook

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी आपली बदनामी केल्याचा आणि प्रतिमा डागाळल्याचा ठपका राखी (Rakhi Sawant)आणि तिच्या वकिलांवर ठेवत त्यांनी दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला (Defamation case) आहे. शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणात अटक झाल्यानंतर समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. त्यांनी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. त्यावर, राखी सावंतचे वकील ॲड. अली काशिफ खान(Ali Kashif Khan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलल्यास बदनामी होत नाही. ‘पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स’, म्हणजेच एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर त्याची बदनामी, मानहानी होत नाही’ असे ॲड. खान यांनी सांगितले. (हेही वाचा: Actor Rakhi Sawant ला कोर्टाचा दिलासा; पती Adil Durrani ने त्याचे खाजगी व्हिडिओ मीडीयात दाखवल्याप्रकरणी केली होती FIR )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)