लवकरच दीक्षाभूमीला मिळणार ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्धेश
नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
संपूर्ण देशासाठी मानबिंदू असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित बैठकीत दिले. नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा वाढीव खर्च पाहता तो तत्काळ प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावा, या स्मारकाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. या स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. ड्रॅगन पॅलेस टेंपलला सुद्धा आवश्यक निधी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी 22 कोटी, शांतिवनसाठी 7.76 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. याही कामाला गती देण्यात यावी. 118 कोटी रुपये खर्च करून संत चोखामेळा वसतिगृहाचे काम करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून हे वसतीगृह 13 मजली करुन 1000 विद्यार्थी क्षमतेचे ते असावे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
संपूर्ण देशासाठी मानबिंदू असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिले. #नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत बैठक घेण्यात आली.#दीक्षाभूमी pic.twitter.com/0gNDDIf8BH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2022 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

