Nagpur Poshan Aahar: शासनाचा लहानग्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात आढळली मृत चिमणी
नागपूरमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Nagpur Poshan Aahar : लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा लहानग्यांसाठी चांगल्या नसल्याचे समोर आले आहे. कारण नागपूरमध्ये लहान मुलांच्या पोषण (Nagpur Poshan Aahar)आहारामध्ये मृत चिमणी आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे. नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे. ० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता. पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पोस्ट पहा-
पोषण आहारात आढळली मृत चिमणी...#Saamtv #Nagpur #Nagpurposhanaahar https://t.co/0HSRKfkC5b
— SaamTV News (@saamTVnews) June 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

