Dead Infant Found in Garbage: पुण्यात कचराकुंडीमध्ये आढळले प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृत अर्भक; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

विमान नगर परिसरातून काल सोमवारी ही घटना उघडकीस आली. प्लास्टिकच्या पिशवीत अर्भक गुंडाळून ठेवले होते.

Baby (File Image)

Dead Infant Found in Garbage: पुण्यात नवजात अर्भक कचराकुंडीमध्ये मृतावस्थेत आढळून आले. विमान नगर(Viman Nagar) परिसरातून काल सोमवारी ही घटना उघडकीस आली. सफाई कर्मचारी सुशीला साळवे (वय 50, रा. इंदिरा नगर) या सकाळी 6.30 च्या सुमारास जेपी नगरमध्ये सफाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला. हे मृत अर्भक(Dead Infant) मुलाचे होते. ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचराकुंडीत फेकण्यात आले होते. साळवे यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३१८ (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवून ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा:Mumbra Accident: अनियंत्रित ट्रकची धडक, अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुंब्रा येथील घटना )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)