Cyclone Biparjoy in Mumbai: मुंबई मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने दाखल केल्या अजून 2 टीम्स
मुंबई सोबतच पुण्यातही टीम्स तैनात आहेत. बिपरजॉय चक्रिवादळाचा लॅन्डफॉल गुरूवारी गुजरात मध्ये होण्याची शक्यता आहे.
एनडीआरएफ कडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबईमध्येही आपल्या टीम्स तैनात केल्या आहेत. मुंबईत एनडीआरएफ च्या एकूण 5 टीम्स आहेत. गुजरात मध्ये 4 टीम्स आहेत. दरम्यान गुजरातला या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. मुंबई सोबतच पुण्यातही टीम्स तैनात आहेत. गुरूवारी या चक्रीवादळाचा लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र, कच्छा भागात हा लॅन्ड फॉल होईल असा अंदाज आहे. Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)