Cyclone Biparjoy चा मुंबईत प्रभाव; गिरगाव चौपाटीवर जोरदार वारं ते रेल्वे सेवा विस्कळीत (Watch Video)

Cyclone Biparjoy आज मुंबई, पुणे भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cyclone प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: Twitter/ANI)

पश्चिम किनारपट्टीवर Biparjoy चक्रीवादळ घोंघावत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ पुढील 24 तासांत रौद्र होणार आहे. आज मुंबईतही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला आहे. अनेक भागात उन्हाचा कडाका असला तरीही वारा जोरदार होता. गिरगाव चौपाटी भागात यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. SW Monsoon 2023 Update: नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पुढील 48 तासात गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात सरकरण्याचा IMD चा अंदाज .

गिरगाव चौपाटी

रेल्वे वाहतूक विस्कळित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now