Cyber Crimes: मनोरंजनातून जागृती! 'हास्यजत्रा'ची क्लिप शेअर करत मुंबई पोलिसांचे केवायसी, ओटीपी आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन (Watch)
मुंबई पोलिसांनी मराठी कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
जर का तुम्ही पेटीएम, गुगल पे, भीम अॅप किंवा नेट बँकिंगचा वापर करत असाल तर तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक प्राप्त करून, सीव्हीव्ही-ओटीपी किंवा केवायसीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सरकार वेळोवेळी याबाबत जनजागृती करत आहेच आता मुंबई पोलिसांनीही जनतेला ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी मराठी कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी केवायसी, ओटीपी, स्कीम आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावधान, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.
याबाबत मुंबई पोलीस म्हणतात, ‘काय समजलिव? हे लक्षात ठेवाल ना? 'पृथ्वी'क वरून कोठूनही फसवणुकीचे 'प्रताप' होऊ शकतात, ऑनलाईन फसवणुकीच्या ज्ञानाचे "पारसमणी" असाल तरच 'शालू ची फिरकी' घेऊन वाचाल! केवायसी, ओटीपी, स्कीम आणि ऑनलाईन बँकिंगच्या फसवणुकीपासून सावधान! मनोरंजनातून जागृती!’ (हेही वाचा: Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Saurabh Chandrakar सह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; 15,000 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)