CSMT Bomb Threat: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; फोन करणाऱ्या व्यक्तीला जीआरपीने घेतले ताब्यात, चौकशी सुरु

कॉल प्राप्त होताच, जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिली, त्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि सीएसएमटी स्थानकाची झडती घेण्यात आली, परंतु काहीही सापडले नाही.

CSMT Station (Photo Credits-Facebook)

CSMT Bomb Threat: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) शुक्रवारी बॉम्बची धमकी मिळाली. पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने सरकारी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि दावा केला की, सीएसएमटी येथे आरडीएक्स ठेवले आहे. या अनोळखी कॉलनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

आता माहिती मिळत आहे की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याच्या धमकीचा फोन करणाऱ्या सचिन शिंदेला जीआरपीने ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा: Shocking: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये यूट्यूब व्हिडिओ पाहून मुले बनवत होती बॉम्ब; अचानक झालेल्या स्फोटात 5 जण जखमी)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now