Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका
यामुळे हा मुंबई मधून नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांमध्ये जाता येते.
Cracks On Atal Setu Viral Video: मुंबई, नवी मुंबई आणि आजुबाजूच्या भागात काल (20 जून) जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान या पहिल्याच जोरदार पावसाने अटल सेतू वर रस्त्याला भेगा पडल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस कडून याचा व्हिडिओ X वर व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका केल्याचं पहायला मिळाला आहे. 'पहिल्याच पावसात जनतेचे १७,८४३ करोड रुपये मोदींनी डुबवले. २५० रू. टोल टॅक्स आकारून निकृष्ट दर्जाच्या अटल सेतू वरून होतोय जनतेचा जीवघेणा प्रवास' म्हणत त्यांनी अटल सेतू वरील परिस्थिती समोर आणली आहे. दरम्यान जानेवारी 2024 मध्येच अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)