Court Orders Muslim Man To Offer Five Times Namaz: रस्ता अपघाताच्या वादातील दोषीला झाडे लावणे व 21 दिवस पाच वेळा नमाज अदा करण्याची शिक्षा; मालेगावच्या दंडाधिकार्यांचा आदेश
प्रकरणामध्ये या व्यक्तीचे वर्तन फार हिंसक नसल्याने, त्याने सुनावणीदरम्यान आपल्याला तुरुंगात न पाठवण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्रातील एका न्यायालयाने रोड रेज प्रकरणातील दोषीला झाडे लावणे आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका मुस्लीम व्यक्तीला रस्ता अपघातात झालेल्या भांडणप्रकरणी मालेगावच्या दंडाधिकार्यांनी दोषी ठरवले आहे. प्रकरणामध्ये या व्यक्तीचे वर्तन फार हिंसक नसल्याने, त्याने सुनावणीदरम्यान आपल्याला तुरुंगात न पाठवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याचे अपील मान्य केले आणि त्याला स्थानिक मशिदीत दोन झाडे लावावीत व 21 दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी अशी शिक्षा सुनावली. रौफ खान (30) याच्यावर 2010 मध्ये एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी आणि रस्ता अपघाताच्या वादातून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.