Shraddha Walkar Murder Case: आफताबच्या नार्को चाचणीच्या परवानगी अर्जाला न्यायालयाकडून मान्यता
दिल्लीतील मेहरौली भागातील श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने तिची निर्घृण हत्या केली.
दिल्लीतील मेहरौली भागातील श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने तिची निर्घृण हत्या केली. त्यानेच पोलिसांसमोर कबुली दिली की, त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले. ते सर्व तुकडे दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत मृतदेहाचे सुमारे 13 तुकडे जप्त केले आहेत. आता हे तुकडे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
श्रद्धा हत्याकांडात साकेत न्यायालयाने आरोपी आफताबला त्याची नार्को टेस्टसाठी विचारणा केली असता त्याने नार्को टेस्टसाठी होकार दिला. कोर्टाने आरोपीला विचारले की तुम्हाला नार्को, त्याचा परिणाम माहीत आहे का, त्यानंतर आरोपीने त्याला संमती दिली. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी आफताबला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात चौकशीसाठी घेऊन जावे लागेल. आरोपी आफताबच्या नार्को अॅनालिसिस चाचणीची परवानगी मागणारा पोलिसांचा अर्जही न्यायालयाने मान्य केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)