Contractual Police Recruitment: 'कुठलीतरी कंपनी नजरेसमोर ठेवून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीचा अजेंडा'; राज्य सरकारवर Jitendra Awhad यांची खडसून टीका

राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

राज्य सरकार मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करणार असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आता सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीचा अजेंडा हा कुठलितरी कंपनी नजरेसमोर ठेवून केलेला आहे. हे सरकार कॉन्ट्रॅक्टदारांचे सरकार आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘एकीकडे जगभरामधून कॉन्ट्रॅक्ट नाहिसे करा यासाठी प्रयत्न केले जात असताना आपल्या राज्यामध्ये मात्र कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगारांचे शोषण करण्याचे काम अधिक जोमाने सुरु आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कामगारांच शोषण हे काही मी वेगळं सांगायला नको. मी आपल्याला ग्वाही देतो की, मी तर आपल्यासोबत उभा राहणारच पण, आपल्या मोर्चामध्ये माझी पत्नी देखिल सहभागी होईल. मी फक्त पाठीमागून समर्थन देणार नाही तर आम्ही तुमच्यासोबत उतरुन तुम्हांला समर्थन देऊ.’ (हेही वाचा: Contract Basis Recruitment: सरकार वरमले, निर्णयाला ब्रेक)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now