Kasara Ghat Accident Video: नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात कंटेनरची 7 वाहनांना धडक; 13 जण जखमी, पहा व्हिडिओ
रविवार असल्याने आज नेहमीपेक्षा जास्त रहदारी होती. याच दरम्यान हा अपघात झाला. घाटातून बाहेर पडत असताना ब्रेक फेल झाल्याने कंटेनर गाड्यांना धडकला. ज्यात लोक जखमी झाले.
Kasara Ghat Accident Video: नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) कसारा घाटात रविवारी भीषण अपघात (Accident) झाला. ब्रेक निकामी झाल्याने सात गाड्यांना कंटेनरची धडक बसली. या अपघातात कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 13 ते 14 जण जखमीही झाले आहेत. महामार्ग पोलिसांचे रूट पेट्रोलिंग पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. घाटावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीकेंडमुळे आज कसारा घाटावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली. रविवार असल्याने आज नेहमीपेक्षा जास्त रहदारी होती. याच दरम्यान हा अपघात झाला. घाटातून बाहेर पडत असताना ब्रेक फेल झाल्याने कंटेनर गाड्यांना धडकला. ज्यात लोक जखमी झाले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Mahrashtra: Around 13 people were injured after a container hit several vehicles at Kasara Ghat on Nashik-Mumbai Highway. Due to the accident, there was a traffic jam on the highway.
(Source: Highway Traffic Police) pic.twitter.com/qCYt09cZ32
— ANI (@ANI) July 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

