शरद पवार यांच्याकडून Eknath Shinde यांचे अभिनंदन- 'महाराष्ट्राच्या हिताची जपणूक होईल ही अपेक्षा'

पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले.

Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

शिवसेनेशी बंड केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपची साथ मिळाली आहे. नुकतेच पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले. यावर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात- 'स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement