Conductor Saves Passenger's Life With CPR: 'बेस्ट' कंडक्टरने सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण

घाटकोपर पासून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका वृध्द व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता, दरम्यान त्याचे प्राण वाचवण्यासाठी कंडक्टरने धाव घेतली.

BEST Bus

Conductor Saves Passenger's Life With CPR: घाटकोपर पासून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका वृध्द व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता, दरम्यान त्याचे प्राण वाचवण्यासाठी कंडक्टरने धाव घेतली. कंडक्टरला दिलेल्या प्रशिक्षणामुळे एकाचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेनंतर सर्वत्र कंडक्टर यांचे कौतुक होताना दिसत आहे. बेस बसमध्ये प्रवास करणारे रोहिदास रामचंद्र पवार यांना ह्रदयविकाराचा झटका आला.  बस मुंलुंड चेकनाक्याजवळ येताच, रोहिदास यांना चक्कर आली, रविवारी २.२० वाजता ही घटना घडली. बस कंडक्टर अर्जुन पांडुरंग लाड यांनी रोहिदास यांना सीपीआर देत त्यांचे प्राण वाचवले.अर्जून यांनी त्यांना लगेच रुग्णालयात देखील दाखल केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement