DRI Mumbai Zonal Unit: CSMI विमानतळावरुन 15 कोटी रुपये किमतीचे 1468 ग्रॅम Cocaine Capsule जप्त
डीआरआय मुंबई झोनल युनिटने ही कारवाई 6 मे रोजी केली. डीआरआय युनिटला विमानतळावरुन अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्री झाल्याची माहिती मिळाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून कोटे डिव्होरच्या नागरिकाकडून तब्बल 15 कोटी रुपये किमतीचे 1468 ग्रॅम कोकेन असलेले 7 कॅप्सूल जप्त करण्या आले आहे. डीआरआय मुंबई झोनल युनिटने ही कारवाई 6 मे रोजी केली. डीआरआय युनिटला विमानतळावरुन अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्री झाल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, डीआरआयने कारवाई करत कोटे डिव्होर नागरिकास ताब्यात घेले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, यापूर्वीही त्याने अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे जबाबात म्हटले आहे. ही तस्करी करताना हे कॅप्सूल्स तो आपल्या शरीरातून नेत असल्याचेही तो म्हणाला. सदर इसमास 6 मे ते 8 मे दरम्यान मुंबईतील सर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे. (हेही वाचा, साकी नाका येथून 9 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, मुंबई पोलिसांनकडून दोघांना अटक)
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)