CNG Rate in Mumbai: अर्थसंकल्पापूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी कपात, जाणून घ्या नवे दर

सीएनजीचे नवीनतम दर 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. सीएनजीच्या दरात या ताज्या कपातीमुळे सीएनजी पेट्रोलपेक्षा बरेच स्वस्त झाला आहे.

(Photo Credit - PTI)

यंदाच्या अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या दरात घट झाली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या सुधारित किमती आता 89.50 रुपये प्रति किलोवरून 87 रुपये प्रति किलोवर येतील. सीएनजीचे नवीनतम दर 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. सीएनजीच्या दरात या ताज्या कपातीमुळे सीएनजी पेट्रोलपेक्षा बरेच स्वस्त झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now