CM Eknath Shinde On International Disability Day: महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय स्थापनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयासाठी राज्य सरकारतर्फे 2063 पदे भरण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय (Disability Ministry In Maharashtra) सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयासाठी राज्य सरकारतर्फे 2063 पदे भरण्यात येणार आहे. म्हणजेच या मंत्रालयाच्या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत तसेच या मंत्रालयासाठी कुठेही पैसेही कमी पडणार नाहीत असं आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी म्हण्टलं आहे अशी महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात दिली.
राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरू झाल्याची घोषणा आज, जागतिक दिव्यांग दिनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. मुंबई विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय #जागतिक_दिव्यांग_दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. pic.twitter.com/sJTCLaocPv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 3, 2022
#LIVE : जागतिक दिव्यांग दिन राज्यस्तरीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.... https://t.co/KB34hdVcax
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

