ठाण्यातील Supermax कंपनीच्या कामगारांना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिला दिलासा; मालमत्तेवर कायदेशीर कारवाई करण्यावर प्रतिबंध

अडीच वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडली होती पण त्यांचे पगार आणि अन्य भत्ते कंपनीने बुडवले होते त्यासाठी आंदोलन करत असलेल्या कामगारांच्या पाठीशी आता सरकार उभे राहिले आहे.

Supermax Thane | Insta

ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी अचानक बंद पडल्याने अनेक कामगारांचे संसार रस्त्यावर पडले. दरम्यान अडीच वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडली होती पण त्यांचे पगार आणि अन्य भत्ते कंपनीने बुडवले होते त्यासाठी आंदोलन करत असलेल्या कामगारांच्या पाठीशी आता सरकार उभे राहिले आहे. सुपरमॅक्स कंपनी ही आता बंद होऊन लिलावात निघालेली आहे. आदेशानुसार आता या मालमत्तेवर कोणाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे. सदर मालमत्तेचा गहाण, तारण अथवा विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने मोठा दिलासा कामगारांना मिळाला आहे.

सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार

 

View this post on Instagram

 

A post shared by Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement