Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024: 'माफी राजं...' म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी अमित ठाकरे यांनी शेअर केली शिवरायांच्या गड किल्ल्यांची दुरावस्था!
इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्रात केवळ मूठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभं केलं मात्र आज त्यांच्या गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. अमित ठाकरेंनी याकडेच लक्ष वेधत काही किल्ल्यांचे फोटोज शेअर केले आहेत. इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरे यांची पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)