Chhatrapati Sambhajinagar Shocker : छत्रपती संभाजीनगरमध्ये 70 जनावरांना पाण्यातून विषबाधा, 20 जनावरांचा जागीच मृत्यू
गावातील एखाद्या माथेफिरूने पाण्याच्या हौदामध्ये युरिया टाकल्याने ही घटना घडली असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar Shocker : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)सोयगाव तालुक्यातील तिडका गावात 60 ते 70 जनावरांना विषबाधा (Animals Poisoned)झाली असून, आत्तापर्यंत 20 जनावरांचा मृत्यू(, Animals Died) झाला आहे. बाधीत जिंवत जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वैद्यकीय पथक सोयगाव तालुक्यात दाखल झाले. इतक्या मोठ्या संख्येने जनावरांना नेमकी कशामुळे विषबाधा झाली याचा तपास सध्या सुरू आहे. गावातीलच एखाद्या व्यक्तीने जनावरांच्या पाण्याच्या हौदामध्ये युरिया टाकला असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा: Bhandara Shocker: भंडाऱ्यात चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू, पोलिसात गुन्हा दाखल )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)