‘धर्मवीर’ सिनेमामधील राज ठाकरे-आनंद दिघेंच्या सीन मध्ये चित्रपट रिलीज नंतरचा बदल अमेय खोपकरांनी क्लिप शेअर करत आणला समोर; उद्धव ठाकरेंवर नवा आरोप (Watch Video)
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध असं ट्वीट अमेय खोपकरांनी केलं आहे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या निकटवर्तीय असलेल्या एकनाथ शिंदेंनी सेनेतच उभी फूट पाडली आहे. आता त्याचे संदर्भ नुकत्याच रिलीज झालेल्या 'धर्मवीर' सिनेमात शोधले जात आहेत. राज ठाकरे आणि आनंंद दिघे यांच्यातील एक सीन थिएटर मध्ये आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ओटीटी वर वेगळा असल्याचं अमेय खोपकरांनी निदर्शनास आणलं आहे. यावर टीका करताना ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशीप आहे का? असा सवाल विचारला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)