Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

Weather Forecast | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकणातील राजगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात उष्णतेचा लाटाचा इशारा वर्तवला आहे. (हेही वाचा- देशात उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीसह उत्तर भारताला पुढील 5 दिवसाचा रेड अलर्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement