Weather Forecast For Tomorrow: 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या मुंबईतील उद्याचे हवामान

19 ते 26 सप्टेंबर दरम्यान, राज्यात पावसाची तूट असेल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भात काही भागात, उत्तर कोकण, तसेच दक्षिण कोकण या दोन्ही विभागांमध्ये पावसाची तूट असणार आहे.

udyache Havaman | File Image

Weather Forecast For Tomorrow: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता धूसर आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात विदर्भात, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, 19 ते 26 सप्टेंबर दरम्यान, राज्यात पावसाची तूट असेल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भात काही भागात, उत्तर कोकण, तसेच दक्षिण कोकण या दोन्ही विभागांमध्ये पावसाची तूट असणार आहे.

तथापी, 26 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  पुढील 24 तासांसाठी कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय, मुंबईत पुढील शनिवारी, रविवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ४८ तासांत पश्चिम बंगाल आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्याचा हवामानाचा अंदाज - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now