Central Railway Special Block in Mumbai: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल. तर CSMT-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 18, 19, 20 मे रोजी रद्द असणार आहे.

AC Local | Twitter

मध्य रेल्वे कडून 17 मे ते 2 जून दरम्यान मुंबई मध्ये सीएसएमटी स्थानकामध्ये 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तारासाठी आणि तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा रात्रकालीन विशेष ब्लॉक असणार आहे. 17-18 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जून च्या रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत दररोज 6 तासाचे विशेष ब्लॉक असणार आहे. यामध्ये काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. मुंबई लोकलच्या देखील ब्लॉकच्या काळात भायखळा-सीएसएमटी स्थानकादरम्यान वाहतूक बंद असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now