महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी CBI चे छापे

सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याच्याविरुद्ध अटक वॉरंट आहे

Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याच्याविरुद्ध अटक वॉरंट देखील आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, घरात कुटुंबातील कोणीही सदस्य नाही. सकाळी आठ वाजता ही छापेमारी झाली. नागपुरातील अनिल देशमुख यांच्या घरात सहा ते सात सीबीआय अधिकारी उपस्थित आहेत. घराबाहेर काहीच हालचाल दिसत नाही. नेहमीप्रमाणे, जेवढी सुरक्षा व्यवस्था असते तेवढे सुरक्षा कर्मचारी उपस्थित आहेत. नागपूर पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत आहेत. घराबाहेरचे गेट बंद आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement