Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर नाशिक, ठाण्यानंतर आता बीडमध्ये गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे.

Sanjay Raut

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात आता बीड (Beed) शहरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे  (Shrikant Shinde)यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now